Ads

Ads Area

उच्च पदस्थ अधिकारीनिर्मितीचे केंद्र म्हणजे जिल्हा परिषद शाळा - मिरगणे

 उच्च पदस्थ अधिकारीनिर्मितीचे केंद्र म्हणजे 

जिल्हा परिषद शाळा-  मिरगणे 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले बहुतांश विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेतून उच्च पदावर आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्याची ताकद जिल्हा परिषदेच्या शाळेतच आहे, असे प्रतिपादन मोहोळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी केले. ते मोहोळ तालुक्यातील इंगोले वस्ती शाळापूर्वतयारी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ, पापरी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे, लोकनेते शिक्षक सोसायटीचे चेअरमन रंजित थिटे, समाधान आसबे उपस्थित होते.गटविकास अधिकारी मिरगणे म्हणाले की, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी तसेच डिजिटल आदर्श शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या इंगोले वस्ती शाळेबद्दल ऐकून होतो. पालकांनी दररोज वेळ काढून थोडा वेळ जरी आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले, तर निश्चितच खूप उल्लेखनीय अशी गुणवत्ता त्या बालकांमध्ये निर्माण होते. सुरुवातीस गटविकास अधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक भास्कर थोरात यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यामध्ये विविध सात स्टॉल उभारण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी या स्टॉलवर चाललेले उपक्रम पाहिले. त्यांच्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, शिक्षणप्रेमी नागरिक बाळासाहेब शेवाळे, शाळेतील माजी शिक्षक रवी चव्हाण, ग्रामसेवक पंडित बारवे, दीपक शेळके, दिगंबर मुळे, किरण लोंढे, हणमंत शिरतोडे, आनंद शिरतोडे, अशोक शिरतोडे, अमोल पाटणे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात माता पालक योगिता शिरतोडे, सुजाता आसबे, अनुष्का लोंढे, अंगणवाडी सेविका रंजना माळी, सारिका पवार आदींनी स्वयंसेवक म्हणून स्टॉलची जबाबदारी उत्तम सांभाळली होती. यावेळी शिक्षक महेश गोडगे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महेश गोडगे, तर आबासाहेब दळवी यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक महादेव साबळे, पालक, माजी विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close