"विठ्ठला तूच" मराठी चित्रपट 3 मेला राज्यभरात होणार प्रदर्शित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 26, 2024

"विठ्ठला तूच" मराठी चित्रपट 3 मेला राज्यभरात होणार प्रदर्शित

 "विठ्ठला तूच" मराठी चित्रपट 3 मेला राज्यभरात होणार प्रदर्शित 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "विठ्ठला तूच" हा मराठी चित्रपट शुक्रवार दि. 3 मे रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्रफुल्ल मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

        विठुरायाला साकडं घालणारा तसेच विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी धडपड करणारा आशय असलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील विठ्ठला तूच या गाण्याला या प्रेक्षकांनी भरपूर पसंती दर्शवली आहे.  विठ्ठल प्रत्येकात असतो आणि वेगवेगळ्या रूपात प्रत्येकालाच मदत आणि सेवा करत असतो.

 हेच या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. आशयघन आणि रोमँटिक कथेची सांगड घालत हा चित्रपट साकारण्यात आला आहे. वाय. जे. प्रोडक्शन निर्मित हा चित्रपट आहे. यामध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत योगेश जम्मा तर प्रमुख नायकेच्या भूमिकेत उषा बिबे या दिसणार आहेत.  संगीतकार हर्षित अभिराज यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिगदर्शनाची जबाबदारी प्रफुल्ल मस्के यांनी सांभाळले आहे. चित्रपटाची गीते कवी विनायक पवार, हर्षित अभिराज यांनी लिहिले आहेत. गायक जावेद अली, वैशाली माडे, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गीते गायली आहेत. एडिटिंगची जबाबदारी झिंगाडे यांनी पार पाडली आहे,असे  दिग्दर्शक मस्के यांनी सांगितले.

          या पत्रकार परिषदेस योगेश जम्मा , प्रवीण भोसले, संतोष बंडगर, संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages