Ads

Ads Area

महावितरण कंपनीचे अधिकारी लोखंडे यांना बडतर्फ करा : गणेश इंगळे

 महावितरण कंपनीचे अधिकारी लोखंडे यांना बडतर्फ करा  : गणेश इंगळे

अकलूज(कटूसत्य वृत्त):-म रा वि वि कंपनीचे अकलूज चे अधिकारी लोखंडे  हे मनमानी कारभार करत आहेत म्हणून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी युवासेनेचे जिल्हा प्रमुख यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता अण्णासाहेब काळे यांना केली आहे . सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत संगम गावामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर झाला आहे .संगम गावातून भिमा नदी वाहत आहे .जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भिमा नदी काठ हा 6 तास लाईट सोडण्याचे आदेश दिले आहेत .व आठवड्यातून एकदा म्हणजे बुधवारी म रा वि वि कंपनीचा मेंटनस दुरुस्ती साठी दिवस भर लाईट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत .बुधवारी फक्त पिण्याच्या पाण्या साठी दिवसातून एक तास लाईट चालू ठेवण्यास सांगितले आहे .परंतु लोखंडे साहेब यांनी बुधवार दि 17 एप्रिल 2024 रोजी म रा वि वि कंपनी चे संगम या गावा मध्ये मेंटनेस चे एक तास ही काम नसताना भिमा नदी काठी फक्त 1 च तास लाईट दिली आहे त्यानंतर बुधवार दि 24 एप्रिल 2024 रोजी नियमानुसार रात्र पाळी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी लाईट चालू होऊन  सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी बंद होणार ही नियमानुसार  असताना पाळी मध्ये मेंटनस  करता येत नाही तरीही संगम येथील ऑफिस ला लाईट फक्त 1 च तास सोडण्याचे आदेश दिले होते याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच हे लोखंडे नावाचे अधिकारी हे शेतकऱ्यांचा कॉल रिसिव्ह करत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना अकलूज येथील अधिकाऱ्यांना संपर्क करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आईन उन्हाळ्यात नाहक त्रास होत आहे लोखंडे साहेब यांच्या मनमानी कारभारामुळे शेकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा अकलूज येथील कार्यालयावर युवा सेनेच्या वतीने लोखंडे या अधिकाऱ्यापासून शेतकऱ्यांची नाहक त्रासाची सुटका करण्यासाठी नग्न आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे .यावेळी शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर संजय कांबळे सागर साळुंके करण कांबळे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close