सीईटीच्या तारखांत लोकसभा निवडणुकीमुळे बदल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 23, 2024

सीईटीच्या तारखांत लोकसभा निवडणुकीमुळे बदल

सीईटीच्या तारखांत लोकसभा निवडणुकीमुळे बदल


 मुंबई (कटूसत्य वृत्त):-लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या तारखांत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या 8 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे. पीजीपी-/एम.एस्सी/एम.एमसी(पी अँड ओ) या सीईटीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले असून सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली एमएचटी सीईटी यापूर्वी 16 एप्रिलला होणार होती आणि 30 एप्रिलला संपणार होती. आता ही परीक्षा 22 एप्रिलनंतर होणार आहे. पीसीबी गटाची परीक्षा 22, 23, 24, 28, 29, 30 एप्रिल या तारखांना, तर पीसीएम गटाची परीक्षा 2, 3, 4, 5 मे, 9, 10, 11 मे, 15, 16 मे रोजी होणार आहे. एएसी सीईटीची त्याच तारखेला म्हणजे 12 मे रोजीच होणार आहे. बीए/बीएस्सी, बीएड (4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)ची सीईटी 2 मे रोजी होणार होती. ती आता 17 मे रोजी होणार आहे. एमएएचएलएलबी (पाच वर्षे) ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. आता नव्या तारखेनुसार 17 मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकांची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊनच परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages