सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन आ. प्रणितीताई शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावभेट केली. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 23, 2024

सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन आ. प्रणितीताई शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावभेट केली.

 सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी, सोलापूर लोकसभा

 मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन

 आ. प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावभेट केली.

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. प्रणितीताई शिंदे ह्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी यत्नाळ, होटगी, फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी, बंकलगी, संजवाड, औराद, राजूर, बिरनाळ, होनमुर्गी, सिंदखेड, मद्रे, घोडा तांडा आदी गावांना भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशातील हुकूमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, बी बियाणे, खते, औषधी यांचे प्रचंड वाढले. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. पाण्याचे नियोजन नाही, दुधाला दर मिळत नाही, विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सोरेन यांना अटक करतात, विरोधी पक्षाचे खाते सिल करतात, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत, निलंबित करतात, ही लोकशाही आहे की हुकूमशाही ?  काडादीना त्रास देण्यासाठी राजकीय सुडातुन सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत माडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे. यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. सोलापूर लोकसभेतील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी. अशी विनंती आ. प्रणिती  शिंदे यांनी केली.

या दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, सुभाष पाटोळे, डॉ सोमनाथ देशमुख, केदार दिंडूरे, निसार कांबळे, नरसप्पा दिंडूरे, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, लक्ष्मण तळेकर, आप्पाशा मंडोली, रमेश तोरणगी, सिद्धाराम गोळेगार, माणिक यलगेरी, मुजीब शेख, अनंत म्हेत्रे, कय्युम बलोलखान, हसीब शेख, राजू जाधव, लाला कांबळे, प्रेम राठोड, किरण सुर्वे, पंडित लांडगे, जोहर शेख, शिवराज पाटील, संजय जाधव, धोंडप्पा तोरणगी,  तिरुपती परकीपंडला, वरुण  सुर्वे, अमोगसिद्ध बुळगुंडे, बसू गवसाने, तुलसीदास राठोड, शाहरुख बलोलखान, राजू इंगळे, वाघेश म्हेत्रे, जाफर शेख, राजू गडदे, राजू सगरे, धर्मराज गुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages