Ads

Ads Area

रंगपंचमी निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

 रंगपंचमी निमित्त मद्यविक्री  अनुज्ञप्त्या बंद

    

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-रंगपंचमी उत्सवा निमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने दिनांक 30 मार्च 2024 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबतचे  आदेश  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत.

तसेच होळी या सणाच्या दिवशी दिनांक 24 मार्च 2024 रोजी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील एफएल-2, एफएलबिआर-2 व एफएलडब्ल्यू-2 या सिलबंद मद्य विक्री अनुज्ञप्त्यांची वेळ रात्री 10.30 वाजलेवरुन  रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close