पोलीस भरतीसाठीचे एसईबीसीचे दाखले तातडीने देण्याची सकल मराठा
समाजाची मागणी ; दाखले न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा
माढा (कटूसत्य वृत्त):- पोलीस भरती प्रक्रियेसाठी एसईबीसीचे दाखले अनिवार्य असल्याने माढा तहसील कार्यालयात मागणी केलेले दाखले तातडीने देण्याची मागणी करणारे निवेदन सकल मराठा समाजाने दिले असून दोन दिवसात दाखले न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या राज्य शासनाची पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी मराठा समाजाच्या अर्जदारास एसईबीसी दाखला अनिवार्य आहे. माढा तहसील कार्यालयात या दाखल्यासाठी अनेकांनी अर्ज केले असून प्रशासकीय दिरंगाईत हे दाखले अडकलेले आहेत. त्यामुळे हे दाखले तातडीने दोन दिवसात न दिल्यास पोलीस भरती प्रक्रियेत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी हे दाखले तातडीने देण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. दोन दिवसात दाखले न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. नायब तहसीलदार विजय लोकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, बाबा मस्के, लक्ष्मण गवळी, रणजित भांगे, जहिर मणेर यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते
0 Comments