Hot Posts

6/recent/ticker-posts

सेवा करणे हा एमपीएससी मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रथम धर्म असला पाहिजे- प्रा. सौ. सुवर्णा गुंड पाटील

 सेवा करणे हा एमपीएससी मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रथम धर्म

 असला पाहिजे- प्रा. सौ. सुवर्णा गुंड पाटील


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर संचलित "यशदा अभ्यासिके" मध्ये अभ्यास करणाऱ्या शिवलाल आसोले या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद लातूर बांधकाम  विभागात कनिष्ठ आरेखक या पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करीत असताना प्रा. सौ. सुवर्णा गुंड पाटील बोलत होत्या. त्या म्हणाल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सेवा हा प्रथम धर्म असला पाहिजे. एमपीएससी मधून निवड झाली आणि थांबलं पाहिजे असं न करता पुढील प्रत्येक यशाच्या टप्प्यावर ध्येय गाठत जाणे हे सुद्धा कार्य त्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असेही त्या आपल्या मनोगत  मध्ये  म्हणाल्या. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने या परिसरात अद्ययावत सर्व सोयीने युक्त अशी यशदा अभ्यासिका तयार करून खूप चांगला उपक्रम केलेला आहे.स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही अभ्यासिका खूप महत्त्वाची अशी ठरणार आहे असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ,लिपिक वृषाली हजारे सहाय्यक लिपिक सौ. दिपाली नरखेडकर, श्वेता मोरे, बालाजी प्रेक्षाळे यांच्यासह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आसोले यांचे पुष्पगुच्छ देऊन  अभिनंदन करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments