Hot Posts

6/recent/ticker-posts

उपचारात सातत्य ठेवले तर टीबी आजार बरा होतो - अधिष्ठता डॉ. तिराणकर

 उपचारात सातत्य ठेवले तर टीबी आजार बरा होतो 

- अधिष्ठता डॉ. तिराणकर

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सिव्हिलमध्ये जनजागृती.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- टीबी हा मोठा आजार नसून त्या आजारावरती रुग्णांनी उपचारात सातत्य ठेवलं तर तो आजार अगदी सहजासहजी बरा होतो .त्याबाबत रुग्णांनी कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण ठेवू नये .फक्त डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी उपचार घेतला पाहिजे असे मत अधिष्ठता डॉ.विद्या तिरानकर यांनी व्यक्त केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी विभागामध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. तिरानकर या बोलत होत्या.

या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तोडकर, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल धडके, सहयोगी प्राध्यापक डॉ. काबरा, वैद्यकीय अधिकारी एआरटी सेंटर )डॉ. गायकवाड, सहयोगी प्राध्यापक डॉ अनिता बंदीछोडे , आधीजण या उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  क्षयरोग जंतूचा २४ मार्च १८८२ रोजी शोध लावणारे डॉ. रॉबर्ट काँक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. विठ्ठल धडके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालयांमध्ये टीबी आजारावरती सर्व प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहे .यासाठी तज्ञ डॉक्टरांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे .रुग्णांनी टीबी सारखा आजार अंगावर न काढता त्वरित उपचार घेऊन त्या आजारातून मुक्त व्हावे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्बास सय्यद यांनी केले. तर आभार डॉ.सुनिता गायकवाड यांनी मानले.


पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी विभागामध्ये टीबी आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनीच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते

Reactions

Post a Comment

0 Comments