मराठा आंदोलकांचे नाव पुढे करून भाजपाने चिडून हा भ्याड हल्ला केला
- जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अरुण जाधव
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपस पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच गुरुवार रात्री पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मतदाराच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला .या भ्याड कृत्याचा निषेध जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी पत्रकान्वये केला आहे. हा हल्ला मराठा समाजाच्या आंदोलकाने केला आहे. हे म्हणणे बलिशपणाचे आहे. राजा शिवछत्रपतींचा विचार घेऊन कार्य करणारा मराठा समाज लढवय्या आहे पण असे कृत्य करणारच नाही मराठा समाज हा नेहमी महिलांचा सन्मान करतो राजा शिवछत्रपतींचा इतिहास देखील तेच सांगतो मराठा आंदोलकांचे नाव पुढे करून भाजपाने चिडून हा भ्याड हल्ला केल्याचे दिसून येत आहे असे कितीही हल्ले विरोधकांकडून झाले तरी आ. प्रणिती शिंदे या घाबरणार नाहीत असे. जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.
0 Comments