माढा शहर शिवसेनेच्यावतीने राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव
सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
माढा (कटूसत्य वृत्त):-माढयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्या व मुलींच्या शाळा नंबर एक व आश्रम शाळा येथील एक हजार शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आरोग्य मंत्री डाॅ.तानाजीराव सावंत यांचे आरोग्य खात्यात असलेले योगदान सांगुन आता पर्यंत राबवण्यात आलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी प्रवीण लटके यांनी यावेळी उपस्थितांसमोर सांगितली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी प्रवीण लटके,शिवसेना तालुकाप्रमुख मुन्ना साठे,शहर प्रमुख भैय्या खरात,तालुका उपप्रमुख सचिन कदम,योगेश जाधव,महेश मोहोळे, स्वप्नील खरात, मधुकर ठोंबरे, दिनेश घोलप, बाप्पा पवार, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश माळी, मुख्याध्यापक विजय काळे यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

0 Comments