प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना
गॅस शेगडी, सिलेंडर तसेच गृह उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-कष्टकरी आणि असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना तेजस्वीनी महिला उद्योग समूहातर्फे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते गॅस शेगडी, सिलेंडर तसेच गृह उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले. विष्णू मिल चाळीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बुधवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर अनिल सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, हरिभाऊ चौगुले, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख जयश्री पवार, उपप्रमुख मनीषा नलावडे, अनिता गवळी, महाराष्ट्र राज्य कैकाडी समाजाचे अध्यक्ष नागेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज युवक अध्यक्ष दीपक जाधव, सृष्टी ढोकरे, संयोजिका मंगला कोल्हे, शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन जिल्हा समन्वयक जवाहर जाजू, नवनाथ चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख सुजित खुर्द उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. शिवाजी सावंत म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून असंघटित कामगार, महिला कामगार तसेच विविध क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत. याचा लाभ कष्टकरी व कामगारांनी घ्यावा. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे सर्वसामान्यांची कामे करणारे नेतृत्व आहेत. विष्णू मिल चाळीतील कामगारांना त्यांची हक्काची घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. लवकरच त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. संयोजक दिलीप कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. याप्रसंगी शेखर फंड, मंगेश डोंगरे, बाळू सुरवसे, पार्थ कोल्हे, उमाकांत निकम, ज्ञानेश्वर शिंदे, रणजीत कोल्हे, प्रभाकर आदी उपस्थित होते.
ढोकरे, गायकवाड आणि जाधव यांचा झाला विशेष सत्कार

0 Comments