भीमा नदी काठावरील शेती पंपाची तीन फेज लाईट तात्काळ चालू करण्यात
यावी या मागणी साठी युवा सेना आक्रमक
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुक प्रमुख दत्ताभाऊ साळुंखे यांच्या वतीने संगम येथे महाराष्ट्र राज्य विधुत महामंडळाचा निषेध करण्यात आला. दोन दिवसात लाईट सुरुळीत न केल्यास विधुत महावितरण कंपनी अकलूज येथे आत्मदहन करण्याचा दिला ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला
उजनी धरणातून सोलापूर ला पिण्या साठी पाणी भीमा नदीतून सोडले आहे त्यामुळे भीमा नदी काठचा विधुत पुरवठा बंद केला . त्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीचा संगम ता माळशिरस येथे घोषणा बाजी करून निषेध वेक्त करण्यात आला .सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हा मुळे पिके करपून चाललेली आहेत .त्यात विधुत पुरवठा बंद केल्या मुळे आहे हीही पिके करपून जळून जात आहेत शेतकऱ्यांची पिके जर जळून किंवा करपून गेली तर शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. भीमा नदी मध्ये सोलापूर ला पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले होते. पण आधीच भीमा नदी मध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात होते. आणी ज्या ठिकाणी पाणी कमी होते अशा ठिकाणी नदी पत्रात शेतकऱ्यांनी खड्डे खोदून मोटारी चालवत होते. त्यामुळे आपण उजनी धरणातून सोडलेले पाणी शेतकरी शेतीसाठी ते पाणी उपसा करत नाही. जो आधीचा शिल्लक पाणी साठा होता त्याच पाणी साठ्याचा उपसा शेतकरी करत आहे. त्यामुळे भीमा नदी काठचा विधुत पुरवठा तात्काळ चालू करण्यात यावा अशी मागणी महावितरण कंपनी कडे युवा सेनेच्या वतीने करण्यात आला अन्यथा दोन दिवसात युवा सेनेच्या वतीने आत्मदहन करण्यात येईल असा ईशारा गणेश इंगळे यांच्या वतीने देण्यात आला . यावेळी शेतकऱ्यांचे नेते विठ्ठल आबा मस्के नारायण इंगळे कल्याण इंगळे बबन पराडे प्रशांत पराडे सचिन पराडे गणेश काळे सुभाष पराडे सचिन भोसले सचिन ताटे देशमुख अजिनाथ पराडे मगण भोई विकास भोई बापू भोई प्रवीण पराडे ओम पराडे अविनाश पराडे लाव्हा पराडे नवनाथ इंगळे दिपक भोई ओम पराडे नितीन इंगळे सिधू गायकवाड ई शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित

0 Comments