येणारी विधानसभा निवडणूक मी लढवणारच- माजी आमदार रमेश कदम
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ विधानसभा मतदार संघात केवळ आठ महिन्यात मी केलेल्या विकाकामांची जाणीव आजही जनतेने ठेवली असून कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी येणारी विधानसभा निवडणूक मी लढवणारच असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात माझी राजकीय भूमिका जाहीर करणार असून याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी माझे बोलणे सुरू असल्याचे प्रतिपादन माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केले.
मोहोळ येथे स्व. शहाजीराव पाटील सभागृह दि.१५ मार्च रोजी रमेश कदम युथ फाऊंडेशन मार्फत माजी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना माजी आमदार रमेश कदम म्हणाले की, मी तुरुंगातून सुटल्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझे उत्स्फूर्त स्वागत केले. दरम्यान मला माझ्या वैयक्तिक कामामुळे मतदार संघात येता आले नाही, दरम्यान जाणूनबुझुन मी दुसऱ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याबाबत अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मात्र या अफवावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. आपल्या सहकाऱ्यांच्या जीवावर येणारी मोहोळ विधानसभा निवडणूक मी लढवणारच असून मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणाच्यातरी सहकार्याची गरज असते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी माझी राजकीय भूमिका जाहीर करणार असून याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणे सुरू असल्याचेही रमेश कदम यांनी सांगितले.
मी अजूनही कोणतीही स्पष्ट राजकीय भूमिका घेतली नसून त्याबाबत कार्यकर्त्यांशी व जनतेशी बोलणी करूनच पुढील निर्णय घेणार आहे. पुन्हा एकदा गावागावात जनसंपर्क दौरे सुरू करण्यात येणार आहेत. जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही शेवटी माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रमेश कदम यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ही उत्स्फूर्तपणे मनोगते व्यक्त केली.
यावेळी शशिकांत कसबे, प्रदीप निर्मळ, नामदेव काळे, आबा कांबळे, नागेश खिलारे, सुधीर खंदारे, संतोष बिराजदार, जयपाल पवार, धनाजी वाघमारे, संजय वाघमारे, सचिन भिसे, चेतन सकट, पप्पू पवार, कृष्णा जाधव, उमेश वाघमारे, मुक्ता खंदारे, स्वाती माने, पूजा खिलारे, कविता ढोबळे, संग्राम डोंगरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments