Hot Posts

6/recent/ticker-posts

पडताळणी झालेल्या पात्र उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना

 पडताळणी झालेल्या पात्र उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या आस्थापनेवरील 200 तलाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येऊन ऑनलाईन परिक्षा ऑगस्ट व सप्टेंबर-2023 मध्ये घेण्यात आली आहे. तलाठी पदभरतीबाबत टीसीएसजिल्हयाधिकारी कार्यालयाच्या दिनांक दिनांक 22 जानेवारी 2024 व 24 जानेवारी 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार निवड याद्या व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने पात्र उमेदवार यांची दिनांक 8 फेब्रुवारी 2024  रोजी कागदपत्रे पडताळणी करण्यात आली होती. तथापि, TCS कंपनीकडुन सुधारीत केलेल्या निवडसुचीनुसार  राज्य परिक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त् भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील दिनांक 11 मार्च 2024 चे प्रसिध्दीपत्रकानुसार नुसार सुधारीत यादी प्रसिध्द करणेबाबत निर्देश होते. त्याअनुषंगाने TCS कंपनीकडुन प्राप्त झालेल्या सुधारीत गुणानुक्रम यादीनुसार दिनांक 13 मार्च 2024 रोजी सोलापूर जिल्हयाची सुधारीत निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार यापुर्वी दिनांक 8 फेब्रुवारी 2024  रोजी ज्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 200 उमेदवारांपैकी पात्र 113 उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना देण्यात आलेली आहे. तसे आदेश काढण्यात आलेले आहेत. इतर समांतर आरक्षण असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत लवकरच कागदपत्रे पडताळणी करुन त्याप्रमाणे पात्र उमेदवारांना पदस्थापना देणेचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.


Reactions

Post a Comment

0 Comments