समूह लोकगीताच्या स्पर्धेत नेताजी प्रशाला द्वितीय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 13, 2025

समूह लोकगीताच्या स्पर्धेत नेताजी प्रशाला द्वितीय

 समूह लोकगीताच्या स्पर्धेत नेताजी प्रशाला द्वितीय




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील समुह लोक गीताच्या स्पर्धेत निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी 'मोत्याची चुंबळ वर पाण्याचा घडा ग' हे गवळण लोकगीत सादर केले.प्रशालेतील संगीत विभागातील ललिता रॅका, अंकिता कस्तुरी, लहरीका गोने, रक्षिता सुकंनपल्ली, हेमा जुंजा, पूर्वा रेके, गणेश चपळगाव, प्रतीक्षा हंचाटे, सृष्टी बोरामणी, महालक्ष्मी मिसालोलु या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागाचे प्रमुख  शिवानंद पुजारी, विश्वाराध्य मठपती, जयश्री बिराजदार, विनायक कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य  रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, क्रीडा प्रमुख विठ्ठल कुंभार यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages