Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे ‘कृषी विज्ञान केंद्र’ स्थापन करा-खा.धैर्यशील मोहिते पाटील

 अकलूज येथे ‘कृषी विज्ञान केंद्र’ स्थापन करा-खा.धैर्यशील मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्याची मागणी देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.अकलूज आणि परिसरातील कृषीप्रधान भागातील शेतकरी व युवकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संशोधन सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून ही मागणी करण्यात आली.

 सोलापूर जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा कृषी जिल्हा असून येथे बहुतांश लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. पारंपरिक पिकांच्या लागवडीवर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आधुनिक शेतीविषयक ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची गरज तातडीची असल्याचे खासदार मोहीते पाटील यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले.

अकलूज व परिसरातील युवकांना कृषी शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी स्थानिक पातळीवर कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. कृषी विज्ञान केंद्र स्थापनेमुळे शेतीतील नवे प्रयोग, शेती व्यवस्थापन,आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल. असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले.

केंद्र सरकारने हा प्रस्ताव सकारात्मक दृष्टिकोनातून विचारात घेऊन मंजुरी द्यावी मागणी खासदार माहिती पाटील यांनी कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे केली.
Reactions

Post a Comment

0 Comments