श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद - अनिकेत भरणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 13, 2025

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद - अनिकेत भरणे

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद - अनिकेत भरणे




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून भक्तांकरिता परिसरात विकास कामांचा व्यापक कार्यक्रम पाहायला मिळत असल्याचे मनोगत राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचे चिरंजीव अनिकेत भरणे यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोटचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, योगेश कटारे हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे प्रवीण घाडगे, गोटू माने, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, शिव स्वामी, प्रदीप सलबत्ते, कुमार सलबत्ते, अब्दुल धडम, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages