कळमण च्या शेतकऱ्याला आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नामुळे मिळाला न्याय...!
दीडशे वर्षाचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी...!
शेतकऱ्याने व्यक्त केली कृतज्ञता...!!!
मोहोळ (कटू सत्य वृत्त): -मोहोळ मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे आमदार म्हणून यशवंत माने यांनी आपल्या नावाची छाप संपूर्ण मतदारसंघात निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्याला निवडून दिल्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचे काम आमदार या नात्याने यशवंत माने सातत्याने करतायेत.
सर्वाधिक विकास निधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असला तरी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित कामे करण्यासाठी ही ते सातत्याने आघाडीवर आहेत. महसूल विभागातील अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांना जुमानत नाहीत. टेबलाखालून हात ओला केल्याशिवाय फाईल हात लावत नाहीत. त्यामुळे हेलपाटे मारून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आपणास दिसते.
त्यामुळे आपल्या मतदारसंघातील वयोवृद्ध शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या त्रास होऊ नये म्हणून आमदार यशवंत माने जनता दरबारच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करत असून नुकतेच त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कळमण भागातीलवयोवृद्ध शेतकरी शिवाजी मुटकुळे यांनी सांगितलेला प्रलंबित प्रश्न आपल्या कर्तृत्वातून अधिकाऱ्यांना सांगून चुटकीसरशी सोडवल्यामुळे या शेतकऱ्याला प्रचंड आनंद झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेत जमिनीचा दीडशे वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने ८६ वर्षाच्या आजोबांनी थरथरत्या हाताने मानले आमदार यशवंत माने यांचे प्रत्यक्ष विश्राम ग्रहावर जाऊन आभार मानले. मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथून हे आजोबा खास आमदार यशवंत माने यांना भेटण्यासाठी मोहोळ येथील विश्रामगरावर आले आणि त्यांनी आमदार साहेब आपल्यामुळे मला न्याय मिळाला असे विधान केले.त्यानंतर आमदार यशवंत माने यांनी आपली काम करण्यासाठीच तुम्ही मला विश्वासाने निवडून दिले.
काम करणे हा माझा पिंड असून ते माझं कर्तव्य आहे त्यामुळे आणखी काही प्रलंबित कामे असतील तर तेही आपण मार्गी लावू असा शब्द त्यांनी या शेतकऱ्याला दिलाय. आमदार यशवंत माने सध्या मोहोळ मतदार संघामध्ये चर्चेत असून विकास कामामुळे त्यांची वेगळीच निर्माण झालेली आहे.

No comments:
Post a Comment