"शिवजयंती नाचून नाही तर वाचून करु "
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील एका युवकाने मागील तीन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे ऐतिहासिक महापुरुषांची चरित्रे पुस्तक भेट.
यंदाच्या वर्षी ही जेष्ठ इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे लिखित जिजाऊ पुस्तक सोलापूर शहरातील ५० सार्वजनिक ग्रंथालयांना वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
📌 डॉ श्रीमंत कोकाटे ( जेष्ठ इतिहास संशोधक ) यांच्या शुभहस्ते
📌 ग्रंथमित्र कुंडलीक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली
📌 मा राम गायकवाड, मा पांडुरंग सुरवसे, धनंजय चव्हाण यांच्या उपस्थितीत
📘मंगळवार दि ६ फेब्रुवारी रोजी सायं सहा वाजता. जिल्हा ग्रंथालय कार्यालय , ११७ उमा नगरी, मुरारजी पेठ सोलापूर.
आयोजक - ओम धनंजय चव्हाण
.jpg)
No comments:
Post a Comment