देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. आपची मागणी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 5, 2024

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. आपची मागणी.

 देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. आपची मागणी.

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-उल्हासनगर येथे बीजेपी आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केली. या घटनेचा निषेध करत आम आदमी पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून आपच्या पदाधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, संघटन सहमंत्री मेहमूद गब्बूरे, जिल्ह्याचे नेते प्राजक्त चांदणे, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, कुणाल अवतल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages