इलीझियम क्लब दमाणी यांच्या जामश्री परिसरातून सोलापूरचे नावलौकिक वाढविणार
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- इलीझियम क्लब, जामश्री बरोबर भागीदारी करून सोलापुरात एक नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. एकूण पाच एकर मध्ये पसरलेले इलीझियम क्लब दमाणी यांच्या जामश्री परिसरातून सोलापूरचे नावलौकिक वाढविणार ईलीझियम क्लबचे फाउंडर गुरपवित सिंग आणि जामश्री चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश दमाणी फिटनेस व लाइफस्टाइल क्लबच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या क्लब ने नवीन वेंचर सोलापुरात सुरू करीत असल्याचे आम्हाला अभिमान वाटत आहे. तसेच या क्लबने सोलापुरात अव्वल श्रेणीचा स्पोटिंग व लाईफस्टाईल अनुभव देणारा क्लब सोलापुरात सुरू करीत असल्याची माहिती इलिझियम क्लबचे फाउंडर गुरपवीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दमानी नगर येथील जामश्री परिसरात क्लबच्या दालनात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले की जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उत्कृष्ट प्रशासन देण्याचा प्रयत्न आहे. या क्लबच्या सदस्यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभवाची अपेक्षा यामध्ये ठेवू शकतात इथे एक्सक्युजो कार्यक्रम करण्यात येतील तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व कोचिंग कार्यक्रमांतर्गत अनेक गोष्टींचा या क्लबमध्ये समावेश असेल.
इलिझियम क्लब मध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे क्लब मध्ये पूर्णपणे सुसज्ज अशी व्यायामशाळा तज्ञांच्या प्रशिक्षण शुभेच्छा उपलब्ध आहे. शिवाय ग्रुप स्टुडिओ, बॉक्सिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट क्रिकेट लेन्स फुटबॉल टर्फ टेनिस कोर्ट, हाफ ऑलिंपिक आकारमानाचा तापमान नियंत्रित करण्याचा तलाव, पाच हजार चौरस फुटांचा स्पोर्ट्स बार,को - वर्किंग आधुनिक बिजनेस लाउंज आणि चाळीस हजार चौरस फुटांचे अम्पहीथियेटर या मध्ये उपलब्ध आहे.
सतीश दामाणी यांनी सांगितले की इथे सर्व वयोगटातील व वेग वेगळ्या आवडी निवडी असलेल्या सदस्यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभवाची जोड या प्रकल्पाच्या माध्यमातून देऊ करत असल्याचे त्यांनी सांगितले.इलिझियम क्लब या पूर्वी मुबई चेन्नई पुणे येथील आमच्या क्लबला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे आता सोलापुरात ही संधी उपलब्ध करून देत आहोत.
या पत्रकार परिषदेस गुरपावित सिंग, राजेश दमाणी , शर्लिन म्याम, आदी उपस्थित होते.


0 Comments