Hot Posts

6/recent/ticker-posts

एमसीए'च्या विशेष कामगिरीची दखल घेणे आवश्यक-हेमंत पाटील

 एमसीए'च्या विशेष कामगिरीची दखल घेणे आवश्यक-हेमंत पाटील 


'एमपीएल' मुळे असोसिएशन फायद्यात; नवोदित खेळाडूंना संधी

पुणे, (कटूसत्य वृत्त)

राज्यातील नवोदित क्रिकेटरांना योग्य संधी देण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए यशस्वी ठरली आहे. संघटनेच्या गेल्या कार्यकाळातील विशेष कामगिरीची दखल 'खेळाडूवृत्ती'ने घेणे आवश्यक आहे, असे मत इंडिया अगेस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि क्रिकेट प्रेमी हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.३०) व्यक्त केले.

जानेवारीत एमसीएच्या निवडणुका होवू घातलेल्या आहेत. अशात लोढा समितीच्या शिफारसी नूसार ज्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांनी स्वत:हून बाहेर पडले पाहिजे. असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. येत्या निवडणुकीत नवीन लोकांना संधी देणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.

एमसीएचा गेला तीन वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक ठरला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्र प्रीमियर लीग मुळे असोसिएशनच्या तिजोरीत भर पडला आहे. राज्यातील नवोदित खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळाले. महिला संघाला देखील संधी मिळाल्याने राज्यातील क्रिकेट विश्वास समाधानकारक वातावरण आहे, असे पाटील म्हणाले. विश्वासाचे हे वातावरण कायम राखण्याची जवाबदारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. एमसीए च्या कारभारात आणखी पारदर्शकता त्यामुळे आणली पाहिजे, असे पाटील म्हणाले.

विशेष म्हणजे एमसीएकडून नेमण्यात आलेली निवड समितीने उत्कृष्ट कार्य केल्याने त्याचा फायदा नवोदित क्रिकेटरांना झाला.असोसिएशनमधील आजीव सदस्यांची संख्या १६१ वरून ५७२ वर पोहचली आहे. एमसीएचा कामाचा व्याप लक्षात घेता या सदस्यांच्या यादीत राज्यातील आणखी क्रिकेट प्रेमींसह काही क्रिकेट अकादमींना देखील संधी देता येईल,असे आवाहन पाटील यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments