लक्कमादेवी प्रशालेची सहल आनंददायी वातावरणात संपन्न.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळी येथील लक्कमादेवी प्रशालेची शैक्षणिक सहल मुख्याध्यापक षडाक्षरी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पाडली. या सहलीत विद्यार्थ्यांनी मैसूर पॅलेस, श्री वेणुगोपाल मंदिर, वृंदावन गार्डन, मडकेरी येथील कावेरी निसर्गधाम, कॉफीचे मळे, मैसूर पाक कारखाना, चामुंडेश्वरी मंदिर, प्राणीसंग्रहालय यासारख्या ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळांना भेटी दिल्या. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबरच अनुभवातून प्रत्यक्ष शिकण्याची संधी त्यांना मिळाली. या सहलीत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ही सहल यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका लिंबाबाई बगले- पाटील, अजयकुमार संकपाळ श्रीराम काळे व शंकर बिराजदार यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

0 Comments