Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी येथे खासगी ट्रॅव्हल बसची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक ट्रॅव्हल चालक किरकोळ जखमी

 सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी येथे खासगी ट्रॅव्हल बसची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक ट्रॅव्हल चालक किरकोळ जखमी 


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-दिनांक  ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी येथे  मुंबई वरून हैदराबाद येथे जाणाऱ्या एक खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक NL 01 B 1869 ने सोलापूर कडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात खासगी ट्रॅव्हल बस चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने ट्रॅव्हल बस मधील प्रवासी थोडक्यात बचावले असून या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की ट्रॅव्हल बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या अपघातामुळे पुण्याहुन सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक , रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब  महामार्ग पोलिस मदत केंद्राचे  प्रभारी अधिकारी  श्री. किरण आवताडे (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने या अपघातातील खासगी ट्रॅव्हल बस वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून या अपघातात खासगी ट्रॅव्हल चालक किरकोळ जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख श्री विजय साळुंखे यांनी दिली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments