उजनी धरणात पाणी सोडा युवा सेनेचा सोलापूर पुणे महामार्गावर रस्ता रोको - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 2, 2024

उजनी धरणात पाणी सोडा युवा सेनेचा सोलापूर पुणे महामार्गावर रस्ता रोको

 उजनी धरणात पाणी सोडा युवा सेनेचा सोलापूर पुणे महामार्गावर रस्ता रोको

पुणे जिल्ह्यातिल सर्व धरणातील मिळून उजनीत दहा टीएमशी पाणी सोडण्याची केली मागणी

टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशाने युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या  मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणात दहा टीएमशी पाणी सोडावे यासाठी शिराळ टें येथे रस्ता रोको  आंदोलन करण्यात आले यावेळी  माढा तहसीलदार विनोद रणवरे साहेब व टेंभुर्णी चे पी आय दीपक पाटील साहेब यांनी निवेदन स्विकारले . यावेळी गणेश इंगळे सचिन बागल किशोर देशमुख महादेव बंडगर सुरेश लोंढे  यांनी आपले मनोगत मांडले .सध्या     उजनी धरण हे मायनस मध्ये गेलेले असून उजनी धरणावरती अवलंबून असणारी शेती तसेच सोलापूर पुणे अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील कर्जत जामखेड धाराशिव सोलापूर इंदापूर बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे त्या पाणीपुरवठा योजना बंद पडतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना तर पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो त्याही सर्व योजना बंद पडतात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो त्यामुळे भामा आसखेड  कळमोडी व इतर धरणातून पाणी उजनी धरणात दहा टीएमसी पाणी उजनी धरणा सोडण्यात यावे अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा उजनी धरणात पाणी नाही सोडले तर यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी महादेव बंडगर पिंटू तात्या चव्हाण   सुरेश लोंढे सोमनाथ ढवळे सचिन इंगळे सिद्धेश्वर जाधव जयदेव पवार शंभूराजे फुगे स्वप्निल गवळी तुकाराम पाटील विठ्ठल आबा मस्के गुणा वाघ गणेश लोकरे महादेव लोकरे नवनाथ जगताप विनोद निर्धार विजय गायकवाड विठ्ठल मेटे दत्ता भाऊ मिटकलं समाधान चव्हाण पप्पू लोकरे दतात्रय साळुंखे जयशिंह गायकवाड विशाल गायकवाड गणेश आबा गायकवाड गणेश साळुंखे जगदीश मस्के रणजित पवार अण्णा मस्के शिवाजी मिसाळ नितीन चव्हाण अण्णा घोडके ई शिवसैनिक व युवा सैनिक व शेतकरी उपस्थित होते .

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजयशिंह मोहिते पाटील यांनी या आधी विस वर्षा पूर्वी पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून दहा टीएमशी पाणी उजनी धरणात सोडले होते त्यांचा आदर्श घेऊन अजित पवार  पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्ह्याचे आमदार खासदार या सर्वांनी मिळून उजनी धरणात दहा टीएमशी पाणी आणावे .

गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages