महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 2, 2024

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

 महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन


     सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  शास्त्रीनगर येथील श्री समर्थ विद्यामंदिर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून 'गांधींनी जगाला काय दिले? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी हे होते, तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे, सचिव अरुण शिखरे यांची उपस्थिती होती.

     महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक राजकिरण चव्हाण यांनी 'गांधींनी जगाला काय दिले?' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवशाला उकिरडे यांनी तर आभार प्रदर्शन महादेव चौरे यांनी केले.

      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रुती शिखरे, दिपाली शहाणे, सुवर्णा माशाळे  वर्षा शेळके, ओमश्री चित्रावकर यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages