वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवणेकरिता आगाऊ अर्ज अर्ज विहित पद्धतीने करावेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 24, 2024

वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवणेकरिता आगाऊ अर्ज अर्ज विहित पद्धतीने करावेत

 वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवणेकरिता आगाऊ अर्ज अर्ज

 विहित पद्धतीने करावेत

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज या कार्यालयात लवकरच परिवहन

 वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व ब-याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या परिवहन वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ पासून सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या दरम्यान विहीत नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी (केवळ क्र १६ अन्वये जारी झालेले डी डी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा, सदर डीडी फक्त "Dy R.T.O. Akluj " यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेचा असावा, या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज कडून देण्यात आली आहे.

      अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (उदा. आधार कार्ड, टेलिफोन बोल इ.). एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी (दि.२९ फेब्रुवारी २०२४  रोजी) सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा, लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये ३००/- पेक्षा कमी रकमेचा नसावा, सदर डीडी फक्त "Dy R.T.O. Akluj "यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेंचा असावा, या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा, दिनांक १ मार्च २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकलूज यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडुन ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

      एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल, कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, वाहन धारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डी.डी.जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही.

नवीन परिहवन संवर्गातील वाहन मालिकेचे वेळापत्रक (MH ४५ AX) दि. २३ ,२६ आणि २७ फेब्रुवारी २०२४ – तिप्पट शुल्कचे अर्ज व परिवहन वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे वेळ – सकाळी ११ ते दुपारी ०४ दि.२८ फेब्रुवारी २०२४ –सकाळी  ११ वाजता यादी जाहीर .  दि.१ मार्च २०२४ तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जांचा लिलाव दुपारी ०३.०० वाजता . -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages