Hot Posts

6/recent/ticker-posts

योग्य आहार नियमित व्यायाम यामुळे आरोग्य सुखकर ज्येष्ठ नागरिक संघाच्या आरोग्य शिबिरात 84 तपासणी

 योग्य आहार नियमित व्यायाम यामुळे आरोग्य सुखकर

 ज्येष्ठ नागरिक संघाच्या आरोग्य शिबिरात 84 तपासणी

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ प्रणित आरोग्य कक्ष आणि जेष्ठ नागरिक कक्षातर्फ  तर्फे आयोजित आरोग्य शिबिरात तब्बल 84 जणांनी तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये  डॉ. सुरेश व्यवहारे यांनी गुडघेदुखी, आयुर्वेदिक उपचार, आणि हाडांची ठिसूळताची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. नियमित व्यायाम योग्य आहार घेतल्यास आरोग्य सुखकर होते. असे मार्गदर्शन व्यवहारे यांनी केले.

 मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते  छत्रपती महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य कक्ष व जेष्ठ नागरिक कक्षातर्फे शुक्रवारी विजापूर रोड येथील भारतीय विद्यापीठातील एम. एस डब्ल्यू हॉलमध्ये आरोग्य शिबीर पार पडले. यावेळी विचारपिठावर मराठा सेवासंघाचे विभागिय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. जी.के. देशमुख, महागर अध्यक्ष सुर्यकांत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नवनाथ कदम, शिरीष भोसले, लक्ष्मण महाडिक   आर.पी .पाटील, राहुल मांजरे, डाॕ.नयना व्यवहारे , लता ढेरे, उपस्थित होते.

  या आरोग्य शिबिरामध्ये गुडघेदुखी तसेच हाडांमधला ठिसूळपणा त्यावर केले जाणारे उपचार यावर डॉ. सुरेश व्यवहारे यांनी सखोल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक हे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांनी आपले जीवन सुखकर करण्यासाठी रोज पालेभाज्याचा आहार घ्यावा, आहारामध्ये गाजर मुळा, कांदा याचा वापर करावा. योग्य आहार घेतल्यास आरोग्यदायी जीवन जगता येते असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

  आरोग्य शिबिराचा श्री समर्थ जुळे सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळाजेष्ठ नागरिक संघ, साक्षात जेष्ठ नागरिक संघ, नंदनवन जेष्ठ नागरिक संघ, द्वारकाधीश ज्येष्ठ नागरिक संघ, प्ररेणा  ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. जवळपास 84 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments