स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 6, 2024

स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

 स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या खटल्यातून

आरोपीची निर्दोष मुक्तता


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या खटल्यामधील आरोपी नामे :- सुरज रायप्पा सोनकांबळे रा. सोलापूर याची विशेष सत्र न्यायाधीश सोलापूर श्रीमती. के. डी. शिरभाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या बाबत सवीस्तर हकीकत अशी की, स्वत:च्या ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १६ जून २०१९ मध्ये आरोपी नामे:- सुरज रायप्पा सोनकांबळे याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिस स्टेशन मध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालाकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ चे कलम ३, ४, ५, ६, ७, ८, ११, १२ व भारतीय दंड संहिता अधिनियम चे कलम ३७६, ३७६ (२) (एफ), ३७७ नुसार गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध सोलापूर येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षिदार तपासले परंतु घटणास्थळावरील नेत्र साक्षिदार सरकार पक्षाने तपासले नसल्याचा व घटनास्थळाचे साक्षिदार व पती पत्नीच्या वादातून ही खोटी फिर्याद दाखल कलेली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता तो ग्राह्य धरुन मा. विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त केले आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अॅड. पी. एस. जन्नू यांनी काम पाहिले व आरोपी तर्फे अॅड. सागर ता. पवार, अॅड. नागेश साबळे, अॅड. सतिश राजमाने यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages