श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर
पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली. युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. रविवारी सळई मारूती सभागृह, पत्रा तालीम येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्यनंदी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेश फडकुले, उद्योजक हर्षल कोठारी, नगर विकास विभागाचे प्रथम लिपिक श्रीकृष्ण मस्तूद, रोटरी क्लब आँफ सोलापूरचे असिस्टंट गव्हर्नर सुहास लाहोटी, म.स.पा अध्यक्ष प्रा.श्रुती वडगबाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळयास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अंलकुटे, प्रकाश आंळगे, केशव भैय्या, राजेश केकडे, अभिजित व्होनकळस, गणेश येळमेली, शामकुमार मुळे, श्रीपाद सुत्रावे यानी केले आहे.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
शिवसृष्टी प्रतिष्ठानचे अमोल केकडे (सामाजिक), अमित भूमकर (उद्योजक), जितेश नन्ना (सुपर स्टॉकिस्ट), प्रभू पडसलगी (विमाक्षेत्र ), डॉ.नयना व्यवहारे, सनी दौलताबाद (कॉन्ट्रॅक्टर) आदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

0 Comments