Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव भक्तीभावाने संपन्न

श्री वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव  भक्तीभावाने संपन्न

 काशी जगद्गुरुंची बाळीवेस ते होटगी भक्ता समवेत पदयात्रा


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-होटगी मठाचे वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची 68 वी पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मंगळवारी पहाटे दोन दहा वाजता उत्तर कसबा येतील होटगी मठात चिटगुपाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करून वीरतपस्वीजींना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली. यावेळी वडांगळीचे पंडिताराद्य शिवाचार्य महास्वामीजी, सुलतानपूरचे शंभू सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी, वेळापूरचे महास्वामीजी उपस्थित होते.

      त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या शिरावर श्री वीरतपस्वी आत्मज्योत धारण केले यावेळी उपस्थित भाविकांनी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय, तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय घोषणा दिल्या त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत सर्वात पुढे ट्रॅक्टरवर श्री वीरतपस्वीजींची प्रतिमा, हलगी, बँड, विविध गावचे पूरवंत श्री वीरतपस्वी यांची पालखी, संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांचे पथक, गाण्यावर नृत्य, बैल जोडी व रथ यासह ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस चाटी गल्ली मंगळवार पेठ मधला मारुती विजापूर वेस पंचकटा, गुरुभेट, सात रस्ता, गांधीनगर, होटगी नाका, मजरेवाडी या पारंपारिक मार्गाने ही मिरवणूक निघाली मिरवणूक मजरेवाडी विसावा येथे आल्यानंतर मजरेवडीतील महिलांनी डोक्यावर जलकुंभ आणून आत्मज्योतीचे स्वागत केले मिरवणुकीच्या वाटेवर ठिकठिकाणी भक्तांनी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या घालून मिरवणुकीचे स्वागत करीत होते व आत्मज्योत आपल्या शिरावर घेत होते होटगी नाका येथे माजी आमदार दिलीप माने व किनारा हॉटेल येथे आमदार सुभाष देशमुख यांनी आत्मज्योतीचे स्वागत केले .मिरवणूक होटगी येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी ज्योतीचे स्वागत करून गावातून भव्य मिरवणूक काढले .मठात आत्मज्योतीचे आगमन झाल्यानंतर महामंगल आरती होऊन श्री वीरतपस्वी आत्मज्योत पदयात्रेची सांगता करण्यात आली यावेळी शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मसभा झाली . सायंकाळी चार वाजता रथोत्सव कार्यक्रम पार पाडला मार्गावर भक्तांनी आत्मज्योतीचे आरती करून दर्शन घेत होते . कलासंगम फाउंडेशनच्या वतीने बाळीवेस ते गुरुभेट पर्यंत रांगोळीच्या सुंदर पायघड्या घालण्यात आल्या होत्या कला संगमच्या रूपाली कुताटे, संध्या वैद्य ,अश्विनी भोगडे ,अविनाश जवळकोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  सुंदर रांगोळी काढून गुरुचरणी आपली  सेवा समर्पित केले संजय भोगडे व दासोह स्वामी यांनी भक्तांना गंध लावण्याचे काम केले वीरतपस्वी स्काऊट पथक एमआयडीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेचे काम केले. 

 या भक्तांनी अर्पण केली गुरुचरणी सेवा:- मिरवणूक मार्गावर बाळीवेस येथील संकल्प प्रतिष्ठान , कसबा गणपती, गुरु भेट येथे सुभाष उमदी, किनारा हॉटेल समोर प्रकाश जमा व  रवींद्र दुलंगे, आसरा येथे राजश्री ज्वेलर्सचे गुणशेखर तंबाके व प्राईम केअर हॉस्पिटल. मजरेवाडी येथे शिवपुत्र कळगीकर ,भाग्यश्री पार्क येथे रमेश फुलारी, संतोष चिवडशेट्टी, सिद्धाराम बिराजदार, भारत माता येथे लक्ष्मीकांत त्रिशुले ,विजयकुमार हुले. गौरीशंकर आळंगे, विश्वनाथ मठपती चिवडशेट्टी कृषी सेवा केंद्र च्या वतीने गंगाधर चिवडशेट्टी , हत्तूरे नगर  येथे नागेश करपे व संजीवनी हॉस्पिटलचे काशिनाथ पाटील ,कुमठा कॉर्नर येथे शिवकुमार दिंडुरे शिवशाही येथे राजशेखर रोडगीकर ,शंकर नगर येथे ढोले पाटील ,कामशेट्टी ,नदाफ, कारखाना येते नागेश कलुरकर, महेंद्र कोठाणे, होटगी तलावाजवळ नागेश शिवशक्ती ,हरीश पाटील ,गुरुराज आलुरे मडीवस्ती जवळ माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ रामपुरे या सदभक्तांनी पदयात्रेत भाविकांना प्रसादाचे वाटप करून गुरुचरणी आपली सेवा बजावली. साखर कारखाना येथे  श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या वतीने उसाचा रस देण्यात आला 

 यंदाच्या मिरवणुकीतील लक्षवेधी घटना  एस व्ही सी एस हायस्कूल एमआयडीसी चे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील शिक्षकांनी सादर केलेला लेझीमचा बहारदार नृत्य धोत्री येथील सदभक्त अभिजीत घागरे यांनी फोमचे  तयार केलेली अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती. होटगी ता द सोलापूर येथील मठात हत्तुरच्या सौ. वर्षा राजशेखर वाले यांनी वाळूत रेखाटलेली चन्नवीर महास्वामीजींची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

यंदाच्या मिरवणुकीत भक्ताकडून प्रसादा वाटप करण्याचा  संखेत वाढ दिसून आली . 

Reactions

Post a Comment

0 Comments