Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळेत शिक्षक पाहिजे... विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात..!

 शाळेत शिक्षक पाहिजे... विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात..!

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथे रिक्त जागी शिक्षक नेमणूक करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, व गटशिक्षणाधिकारी सोलापूर, यांना शाळा व्यवस्थापन समितीने दिनांक 25 जुलै 2022 रोजी ते 11 नोव्हेंबर 2022 रोजी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतेही दखल घेतलेली नाही



          जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून सदर शाळेत पटसंख्या 44 आहे रोष्टर प्रमाणे पटसंख्या अनुसार शिक्षक चार पाहिजेत.. तसे नसून सध्या एक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी येथे कार्यरत आहे एक शिक्षकावर खूप ताण वाढत आहे या वाढत्या तणामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व तसेच येत्या सात दिवसात शिक्षकांची नेमणूक न झाल्यास आमच्या पाल्यांना गुरेढोरे चालवण्यास परवानगी मिळावे.. असे आशियाचे निवेदन पालक व शाळा व्यवस्थापक समिती इंगळगी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे दरम्यान यावेळी कयूम मोहसीन शेख, सलीम गफूर शेख, फैयाज रशीद शेख, रशीदा अश्फाक शेख, शहानवाज महबूब शेख, सादिया सलीम शेख, जावेद करीम मुल्ला, आयेशा मलंग मनियार, शकील अजिज मनियार, सादिक इब्राहिम शेख, नसीमा हजरत शेख, नाझिया ख्वाजा सय्यद, अजीज इस्माईल गोंदवले, नुरोदिन गोंदवले, शब्बीर इस्माईल गोंदवले, साहेबलाल रमजान शेख, यांसह विद्यार्थी व पालक मंडळी यांची उपस्थिती होती

Reactions

Post a Comment

0 Comments