भाजपला सुप्रीम दणका..! आपने केला विजयोस्तव साजरा..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 20, 2024

भाजपला सुप्रीम दणका..! आपने केला विजयोस्तव साजरा..!

 भाजपला सुप्रीम दणका..! आपने केला विजयोस्तव साजरा..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  चंदीगड महापौर निवडणुकीत आपचे कुलदीप कुमार विजयी झाले. सुप्रीम कोर्टाचा निकाल. आणि पुनः झालेली काऊंटिंग यां आधारावर आपचे महापौर विजयी झाले.या विजयाचा आनंद सोलापुरात आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केला. शहर कार्यालय येथे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमून विजयोस्तव साजरा केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन देखील करण्यात आले. आणि भारतीय संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, मोदी तेरी हिटलर शाही नही चलेगी नही चलेगी, मोदी तेरी वोटो की चोरी नही चलेगी नही चलेगी, अश्या घोषणांनी परिसर दनानून गेला.फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवत विजयोस्तव साजरा करण्यात आला.यावेळी पदाधिकारी बोलताना म्हणाले आज हुकूमशाहीचा पराभव झाला आणि लोकशाहीचा विजय झाला आहे.

यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, संघटक जुबेर हिरापुरे, सह संघटक मेहमूद गब्बूरे, संघटक आनंद जाधव, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, सह संघटक अझर शेख, शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ, सह संघटक दिगंबर पांढरे, अशोक कुमार वैद्य, राहुल यारोळ, संदेश कांबळे, विनोद माहिणकर, सोहेल शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages