Ads

Ads Area

तानुबाई बिरजे पञकार कक्षाची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर हरीचंद्र कदम शहराध्यक्ष ; अरविंद मोटे कार्याध्यक्ष

 तानुबाई बिरजे पञकार कक्षाची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर  

हरीचंद्र कदम शहराध्यक्ष ; अरविंद मोटे कार्याध्यक्ष 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार  कक्षाची शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली आहे. हरिश्चंद्र कदम शहराध्यक्ष अरविंद मोटे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मोहोळ,  उत्तर सोलापूर ,दक्षिण सोलापूर ,बार्शी आणि अक्कलकोट तालुक्याचे तालुकाध्यक्ष देखील जाहीर करण्यात आले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित छत्रपती महोत्सव  उपक्रमांतर्गत या निवडीचे पत्र उपस्थित त्यांना देण्यात आले.  मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत शिवजयंती पासून ते राजाराम महाराज जयंती पर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित केला जातो. या उपक्रमा अंतर्गत मंगळवार  20 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा तानुबाई  बिरजे पत्रकार कक्षाच्या वतीने गौरव करण्यात आला.

      यावेळी विचारपिठावर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. जी. के .देशमुख महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, समन्वयक दत्तामामा मुळे , उपाध्यक्ष सदाशिव पवार, निर्मलाताई शेळवने, संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे,  रमेश जाधव, पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती.

 प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती आणि जिजाऊमासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत पत्रकार कक्षाच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी सोलापूर शहराध्यक्ष म्हणून हरिश्चंद्र कदम यांना तर  कार्याध्यक्ष म्हणून अरविंद मोटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. तसेच उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष म्हणून संदीप गायकवाड,  अक्कलकोट तालुकाध्यक्ष पदी प्रशांत  भगरे , मोहोळ तालुकाध्यक्षदी  देविदास नाईकनवरे , दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी संजीव इंगळे बार्शी तालुका अध्यक्षदी गणेश क्षीरसागर यांची नियुक्ती करून त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. 

 प्रारंभी तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक भाषणांमध्ये कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. तनुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारणी गठीत  केल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील ,विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांची भाषणे झाली तर प्रशांत माने आणि पांडुरंग सुरवसे यांनी सत्कारास उत्तरे दिली. 

त्यानंतर विविध दैनिकांमध्ये वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या संजय जाधव, राजकुमार सारोळे , अरविंद मोटे, अनिल कदम, उमेश कदम ,कृष्णकांत चव्हाण,  संजय पवार, प्रशांत माने , दिनेश शिंदे,  प्रमोद बोडके, राकेश कदम,  राजकुमार माने , विशाल भांगे, संतोष पवार ,सागर सुरवसे ,सूर्यकांत आसबे, हरिभाऊ कदम , संदीप वाडेकर ,मनीष केत, नितीन ठाकरे ,धनंजय मोरे,  रामदास काटकर, वैभव गगणे , विजय बाबर , पांडुरंग सुरवसे ., महेश हणमे, अविनाश गायकवाड या समाज बांधव पत्रकारांचा सन्मान पत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सदाशिव पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close