Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी,

 स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी, 

ओरीसा, आंध्रप्रदेश येथुन महाराष्ट्रात गांजा ची तस्करी करणारे आरोपी अटकेत,

आरोपीत यांचेकडुन 564‍ किलो ग्रॅम वजनाचा, 

1,36,83,500, रु.किमतीचा गांजा, वाहने, इत्यादी हस्तगत.

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- ओरीसा आंध्रप्रदेश या राज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतुक सोलापूर ग्रामीण ‍जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 65 वरुन होत असले बाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सदर गोपनीय माहितीच्या अधारे अशा प्रकारे वाहतुक करणा-या आरोपींचा शोध घेवुन त्यांच्यावर कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या.

      सदर सुचना प्रमाणे पोनि/सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे  सपोनि धनंजय पोरे व पोसई सुरज निंबाळकर यांच्या पथकला कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहवा/विजयकुमार भरले यांना गोपनीय  माहिती मिळाली की, दिनांक 19/02/2024 रोजी सोलापूर तालुका हद्दीतुन एका चार चाकी वाहनातुन दोन इसम गांजा हा अंमली पदार्थ आंध्रप्रदेश मधुन घेवुन बारामतीकडे जाणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोनि/ सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे व पोसई सुरज निंबाळकर व पथकाने दिनांक 19/02/2024 रोजी 14.35  सोलापूर ते पुणे जाणारे रोडवर कोंडी गावच्या हद्दीत सिध्देश्वर हॉटेल जवळील पुलावर सापळा रचुन प्राप्त बातमीतील वाहनाचा पाठलाग करुन दोन आरोपींना त्यांचे ताब्यातील अशोक लेलॅंड पिक अप क्रमांक एम.एच. - 42 बी. एफ. 1926 सह ताब्यात घेतले. 

       नमुद इसमाच्या ताब्यातील अशोक लेलॅंड पिक अप क्रमांक एम.एच. - 42 बी. एफ. 1926 मधून 459 किलो 340 ग्रॅम गांजा किंमत रूपये इतर साहीत्य किंमत असा एकूण 1,00,46,900/- रूपयांचा अवैध ‘‘गांजा’’ हा मादक व नशाकारक अंमली पदार्थ मिळुन आला आहे. सदर बाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 118/2024  गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (ii), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/ धनंजय पोरे हे करीत आहेत. नमुद आरोपी यांनी सदर गांजा आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकुलम येथुन घेवुन बारामती येथे जात होते.  नमुद आरोपी यांना मा. न्यायालयाने दिनांक 26/02/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

      तसेच ‍दिनांक 24/01/2024 रोजी पोनि/सुरेश निंबाळकर यांना गोपनीय माहीती मिळाली की, टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मोडनिंब येथील मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावरुन दोन चार चाकी वाहनामधुन काही इसम गांजा हा अंमली पदार्थ घेवुन जाणार आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोनि/ सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे यांच्या पथकाने टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मोडनिंब येथील मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावर सापळा रचुन पाठलाग करुन दोन वाहने त्यावरील चालकासह ताब्यात घेतली. 

     सदर ठिकाणी मिळुन आलेली ब्रीझा कार क्रं. MH-45 N-6752 व ट्रिबर कार क्रंमाक  MH-45 AQ-7821  मध्ये एकुण 105‍ किलो 380 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ दोन्ही वाहनासह एकुण 36,36,600/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर बाबत टेंभुर्णी पोलीस ठाणे गुरनं 40/2024 गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (ii), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीत यांनी नमुद गांजा ओरीसा राज्यातील गुणपुर येथुन घेवुन अकलुज येथे घेवुन जात होते. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/ नागनाथ खुणे हे करीत आहेत. नमुद गुन्हयात एकुण 4 आरोपी अटक करण्यात आली असुन सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

     सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण सुरेश निंबाळकर, सपोनि/धनंजय पोरे, व पोसई/सुरज निंबाळकर यांचे टिम मधील ग्रेड-पोसई- राजेश गायकवाड, सपोफौ/ महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, निलंकठ जाधवर, पोहवा/ धनाजी गाडे, परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरीदास पांढरे, पोकॉ/ यश देवकते, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे,  चापोना/ समीर शेख, दिलीप थोरात, सतीश कापरे, तसेच सायबर पो. ठाणेकडील पोना/ व्यंकटेश मोरे, पोकॉ/ रतन जाधव यांनी बाजवली आहे

Reactions

Post a Comment

0 Comments