Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी,

 स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी,

अंमली पदार्थ मेफेड्राॅन ;डक्द्ध तयार करणा-या आंतर राज्य टोळीचा मुख्य

 सुत्रधार,कलबुर्गी, कर्नाटक येथुन जेरबंद व त्याच्या साथीदारास हैद्राबाद

 येथुन अटक ...


     मोहोळ (कटूसत्य वृत्त):- दिनांक 17/10/2023 रोजी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवडी पाटी येथे हाॅटेल श्री साई समोरील मोकळया जागेत यातील अटक आरोपी यांचे ताब्यात 3.010 कि.ग्रॅम वजनाचे रू. 6,02,00000/- (सहा कोटी दोन लाख रू.) किमतीचा मेफेड्राॅन MD नावाचा अंमली पदार्थ वहातुक करत असताना छापाकारवाई दरम्यान मिळुन आला आहे.  नमुद कारवाई बाबत मोहोळ पोलीस ठाणे गुरनं 762/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम  8 क, 22 क, 29  प्रमाणे दिनांक 18/10/2023 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरेश राऊत, पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे हे करीत आहे.

         नमुद गुन्हयात आरोपीत यांचे ताब्यात मेफेड्राॅन MD नावाचा अंमली पदार्थ वाणिज्य प्रमाणात मिळुन आला आहे. सदर गुन्हा हा अंमली पदार्थाषी संबधीत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी त्याची गांभीर्याने दखल घेवुन नमुद गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्ह्याची संबधीत सर्व आरोपीत यांना अटक करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व मोहोळ पोलीस ठाणे यांना आदेषीत केले होते.

        यातील आरोपीत हे चंद्रमौळी एमआयडीसी व चिंचोळी एमआयडीसी येथील कारखान्यात मेफेड्राॅन MD हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नमुद कारखान्यांवर छापे घालुन ते सिल करण्यात आले आहेत. नमुद गुन्हयातील आरोपीत हे पर जिल्हयातील तसेच परराज्यातील असुन ते आपले वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत होते. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व मोहोळ पोलीस ठाणेच्या पथकाने यातील आरोपीतांचा प्रयागराज उत्तरप्रदेष, रिवा मध्यप्रदेश, चेन्नई, बेंगलोर, हैद्राबाद, तेलंगणा तसेच गुवाहाटी आसाम या ठिकाणी जावुन आरोपीतांचा शोध घेतला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण येथील सहा.पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व त्यांचे पथकाने यातील आरोपी उत्तरप्रदेश येथील चित्रकुट जिल्हयातील बरगढ येथुन तसेच, सहा.पोलीस निरीक्षक, सत्यजित आवटे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी कर्नाटक येथील बिदर जिल्हयातुन आरोपी यांचा शोध घेवुन, तसेच पोउपनि अमित करपे, मंद्रुप पोलीस ठाणे यांनी तेलंगणा येथील जहीराबाद येथुन, त्यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात आता पर्यंत एकुण 12 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीत यांचेकडुन आता पर्यंत 8,82,99,204/- (आठ कोटी ब्याऐंषी लाख नव्यान्नव हजार दोनशे चार रू.)  किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये मेफेड्राॅन MD हा अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, गुन्हयात वापरण्यात आलेली वाहने, आरोपीचे मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहे.

       नमुद गुन्हयाचा मुख्य सुत्रधार हा कर्नाटक, तमिळनाडु, आंध्रप्रदेश, राजस्थान या भागातील अषा प्रकारच्या गुन्हयाचा मुख्य आॅपरेटर/सुत्रधार असुन याच भागात तो आपले अस्तित्व लपवुन राहत होता. तसेच आपली राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. नमुद गुन्हयाचा मुख्य सुत्रधार/आरोपी हा कलबुर्गी, कर्नाटक येथे येणार असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. नमुद माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे षाखा यांना आदेशीत केले होते. सदर आदेषा प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व पोउपनि सुरज निंबाळकर यांच्या पथकाने कलबुर्गी येथील लुंबीनी ग्रॅन्ड हाॅटेल, कलबुर्गी येथे सापळा रचुन शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपीत याचेकडे केले तपासात त्याने अन्य पाहिजे आरोपीत याची माहिती दिल्याने त्यास पोउपनि सुरज निंबाळकर यांच्या पथकाने हैद्राबाद येथुन ताब्यात घेतले आहे. 

          गुन्हयातील मुख्य सुत्रधार याचे राज्य व आंतर राज्य  गुन्हे अभिलेख तपासणी करता त्याचेवर एनडीपीएस अॅक्ट 1985 चे विविध कलमाव्दारे सन 2010 पासुन ते अद्याप पर्यंत महाराश्ट्र राज्यात  व इतर राज्यात खालील प्रमाणे एनडीपीएस कायदे अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

    

अ.क्रं पोलीस ठाणे, जिल्हा अ.क्रं पोलीस ठाणे, जिल्हा

1 मोहोळ पो. ठाणे, सोलापूर ग्रामीण 6 मुरबागअली पो. ठाणे, कर्नाटक

2 खार पो. ठाणे मुंबई षहर 7 ओंगल पो. ठाणे, आंध्रप्रदेष

3 नाषिक रोड पो. ठाणे, नाषिक षहर 8 नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, चेन्नई

4 माणिकपुर पो.ठाणे, पालघर. 9 नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, हैद्राबाद

5 नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, मंुबई 10 नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, अहमदाबाद

       

         नमुद आरोपीत यास दिनांक 14/02/2024 रोजी 15/47 वा. अटक करण्यात आली असुन मा. विषेश न्यायालय, सोलापूर यांनी दिनांक 26/02/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच याचा साथीदार याला दिनांक 16/02/2024 रोजी हैद्राबाद येथुन ताब्यात घेतले आहे. त्यास दिनांक    16/02/2024 रोजी  21 /10  वा अटक करण्यात आली असुन मा. विषेश न्यायालय, सोलापूर यांनी दिनांक 26/02/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.  

        नमुद उल्लेखनीय कामगिरी मा.षिरीश सरदेषपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्षनाखाली सुरेष निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.षाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व  पोउपनि/सुरज निंबाळकर व पथकातील ग्रेड पोउपनि/राजेष गायकवाड, सपोफौ/श्रीकांत गायकवाड, पोहेकाॅ/सलीम बागवान, विजयकुमार भरले, मपोना/दिपाली जाधव, पोकाॅ/अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यष देवकते तसेच सायबर पो. ठाणेकडील पोहेकाॅ/अभिजीत पेठे, पोना/व्यंकटेष मोरे, पोकाॅ/महादेव काकडे यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments