Hot Posts

6/recent/ticker-posts

पार्वती सार्वजनिक वाचनालयात शिवाजी महाराज जयंती साजरी

 पार्वती सार्वजनिक वाचनालयात शिवाजी महाराज जयंती साजरी

बार्शी(कटूसत्यवृत्त):- तालुक्यातील संगमनेर येथे पार्वती सार्वजनिक वाचनालयात शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खुदबुद्दीन जाफर शेख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रंथालयाची सचिव  दयानंद भोसले हे होते .अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ व पुष्पहार अर्पण केला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण आत्माराम भोसले यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच वाचक सभासद म्हणून समाधान राहुल जानराव, गणेश महादेव वाळके, विनोद दिलीप सावंत, हरीश वली बाबा शेख  सुकन्या आत्माराम भोसले इत्यादी वाचक सभासद हजर होते कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटप करून अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या आदेशावरून कार्यक्रम संपल्याची जाहीर केले.

Reactions

Post a Comment

0 Comments