पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर दौरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 13, 2024

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर दौरा

 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर दौरा


 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

  शनिवारी, रात्री 11.00 वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम . सकाळी 09.00 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून वाहनाने  कुंभारी ता.दक्षिण सोलापूर कडे प्रयाण .सकाळी 09.30 वाजता  कुंभारी येथेआगमन व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गतच्या रे नगर गृहनिर्माण प्रकल्प, कुंभारी येथे भेट व आढावा.  दुपारी 12.30 वाजता सिध्देश्वर मंदिर येथे आगमन व नंदीध्वज अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती . दुपारी 03.00 वाजता शांतीसागर मंगल कार्यालय, जुने एम्प्लॉयमेंट चौक येथे आगमन व मा.आ.श्री विजय कुमार देशमुख यांच्या आयोजित स्नेहभोजनास उपस्थिती. दुपारी 04.00 वाजता चार पुतळा,हुतात्मा चौक येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीतून विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा चौक येथील कामाचे लोकार्पण सोहळयास उपस्थिती . दुपारी 04.30 वाजता सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभुवन इमारतीच्या नुतनीकरण कामास सदिच्छा भेट सायंकाळी 05.00 वाजाता जामगुंडी मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे आगमन व महायुती मेळाव्यास उपस्थिती. सायं.07.30 वाजता हॉटेल सुर्या, मुरारजी पेठ सोलापूर येथे आगमन व राखीव नंतर  सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव रात्री 10.15 वाजता सोलापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व सिध्देश्वर एक्सप्रेस ने मुंबई कडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages