Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार बबनराव शिंदेनी भुमिका जाहीर न केल्यास प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा

आमदार बबनराव शिंदेनी भुमिका जाहीर न केल्यास प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा 


माढा  (कटूसत्य वृत्त):-माढा न्यायालयाचे विभाजन होत असल्याच्या प्रश्नी माढा शहरवासिय अधिकच आक्रमक होताना पहायला मिळत आहेत.माढा न्यायालयाच्या विभाजनाला कारणीभूत ठरत असलेल्या वकिलांचा माढ्यात  निषेध नोंदवण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात अरविंद खरात यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या पोस्टर ला जोडे मारुन घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सकल  माढा  शहरवासिय उत्फुर्तपणे सहभागी झाले.

कुर्डूवाडी शहरात कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या दोन बॅचला मंजुरी मिळाली आहे.मात्र या निर्णयाला  माढा शहरवासियांनी कडाडुन विरोध करीत कोणत्याही परिस्थितीत कुर्डूवाडीत स्वतंत्र न्यायालय होऊ न देण्याची भुमिका घेतली आहे. या निर्णया विरोधात माढा शहरातुन भव्य असा  निषेध मोर्चा देखील  काढण्यात आला होता.उच्च न्यायालयात  या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली जाणार आहे.त्यातच शुक्रवार दि.१२ रोजी कुर्डूवाडीत न्यायालय होण्यासाठी ज्या वकिलांनी पुढाकार घेतला त्या वकिलांच्या भुमिकेचा तिव्र शब्दांत निषेध नोंदवुन आंदोलन करण्यात आले.वकिलांचा जाहीर निषेध असे फलक हातात घेऊन माढा शहरवासियांनी त्या फलकाला जोडे मारुन घोषणाही दिल्या.
आंदोलनात माढा शहरातील नेते मंडळीसह नागरिक सहभागी झाले.

 माढ्यापासुन कुर्डूवाडी शहराचे अंतर हे फक्त १३ कि.मी आहे. दळणवळणाची व्यवस्था देखील सोयीची असताना कुर्डूवाडीत न्यायालय नेण्याची गरजच नाही.न्यायालयाच्या मुद्यावर आमदार बबनराव शिंदेनी शांत न बसता आपली भुमिका जाहीर करावी.अन्यथा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आंदोलन करुन निषेध नोंदवण्यात येईल-अरविंद खरात,माढा 

Reactions

Post a Comment

0 Comments