पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीने मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्यास...;
इच्छा मरण पत्करण्याचा नागनाथ बधेंनी राष्ट्रपतीला पत्र पाठवून फोडला टाहो......!
भूसंपादन अधिकाऱ्यांचा जमीन हडप करण्याचा डाव...?
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -"नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले, आणि राजाने छळले" तर फिर्याद कुणाकडे द्यायची असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडतो. परंतु जिथे प्रश्नाचे निर्मिती झालेली असते. त्याच्या अगोदर उत्तराची सोय सुद्धा झालेली असते. परंतु त्यासाठी जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, आणि जिंकू किंवा मरू अशा प्रकारचा निर्धार माणसाकडे असावा लागतो.
तोच निर्धार संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील जमीन बाधित शेतकरी नागनाथ बधे यांनी दाखवून दिला असून त्यांनी सरकारने केलेल्या अन्यायाच्या विरोधात न डगमगता अनेक वेळा उपोषण करून सरकारला घाम फोडला आहे.
सविस्तर वृत्त असे की, " संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व राष्ट्रीय महामार्ग 965 जी व म्हसवड कुर्डूवाडी महामार्ग क्रमांक 548 या अकलूज, माळीनगर ,सवतगाव, महाळुंग, तांबवे येथील जमीन बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) अकलूज यांना सातत्याने या संदर्भात हरकती देऊन सुद्धा त्यांच्याकडून योग्य न्याय मिळाला नाही.
न्याय मागण्यासाठी कोर्टाचे दार ठोठवावे लागले, हेलपाटे मारून वाट मळून गेली आणि उंबरे झिजले चपला फाटल्या. परंतु कामात कुचराई करणाऱ्या आणि वर कमाई साठी चटवलेल्या या भूसंपादन अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे बाजू मांडण्यासाठी आलेल्या बाजू मांडण्याची परवानगी न देता उलट पक्षी त्याची जमीन बळकवण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होऊ लागल्याने नागनाथ बधे या शेतकऱ्याने अखेर आरपारचा प्रयत्न म्हणून ही लढाई जिंकू किंवा मरू या निर्धाराने लढण्याचा आणि जबरदस्तीने मिळकत हडप करण्याचा प्रयत्न केल्यास कुटुंबासहित इच्छा मरण मिळण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतीला अर्ज केला आहे .
जमीन बाधित शेतकरी नागनाथ बधे यांच्यावतीने न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक ,प्रकल्प संचालक, प्रोजेक्ट अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन न्याय मागितला आहे. चुकीच्या नुकसान भरपाई चे अवार्ड व परिशिष्ट घेण्याची व कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याची जबरदस्ती करू नये कागदपत्रे जमा केली नाहीत म्हणून नुकसान भरपाईच्या रकमा वितरित करता आल्या ना..! असे पोकळ म्हणणे दाखल करू नये. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाची संयुक्त मोजणी प्रक्रिया कायद्याच्या आधारे व संविधानाने दिलेल्या अधिकाराचे तंतोतंत पालन करावे.
असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असूनही भूसंपादन करण्यासाठी मनाई केलेले असताना सुद्धा बाधित शेतकऱ्यावर जरब ,दहशत ,आणि त्याच्या मूलभूत हक्काचा खून करून मिळकतीची जबरदस्त घेण्याचा प्रयत्न केल्यामुळेच कुटुंबासहित इच्छा मरण पत्करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नागनाथ बधे यांनी बोलताना सांगितले.
भूमी अधिग्रहता संदर्भात उपविभागीय अधिकारी अकलूज यांनी दिलेल्या हरकतींना लेखी उत्तर देण्यासाठी कधीच आपल्या खिशातला पेन काढला नाही. आम्हाला नैसर्गिक न्याय आणि संविधानाने भारतीय नागरिकास दिलेल्या लोकशाहीच्या अधिकाराचा अपमान केला आहे .
तसेच मूलभूत हक्कापासून आम्हाला वंचित ठेवलंय. उपविभागीय अधिकारी अकलूज यांनी भूसंपादन कायदा 2013 च्या निकषाप्रमाणे पालन केलेले नसून अंमलबजावणी करताना फार मोठी कसूर केली असून घाईघाईने व मनमानी करून भूसंपादन मोबदल्याचा वैयक्तिक किंवा घटनयाही नोटीसा दिल्या व गावाचे अवॉर्ड निवाडा जाहीर केलेले आहे.
विभागीय अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊनही उत्तर न देणे, कायदेशीर बाजू मांडण्यास आम्हाला व आमच्या हायकोर्टातील वकिलांना जाणीवपूर्वक वेळ न देणे, वेळ मारून घेणे, असे प्रकार सातत्याने घडल्यामुळेच माझी मिळकत गिळंकृत करण्याचा (हडप) या अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.
त्यामुळेच घाईघाईने मनमानी पद्धतीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न होत आहे. या उपविभागीय अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केली असून आमच्या सोयीताच्या कायदेशीर योग्य व रास्त बाबीच्या तसेच आमच्या मूलभूत हक्कापासून आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यामुळे मी माझी रास्त भूमिका घेऊन सर्व भारतीयांना संविधानाने दिलेल्या न्याय हक्का करिता लढत असून त्वरित न्याय न मिळाल्यास कुटुंबासह इच्छा मरण पत्करण्याचा इशारा नागनाथ बधे यांनी दिला आहे.

0 Comments