अभ्यासिका होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -सोमनाथ आवताडे
सिद्धापूर फेस्टिवलमध्ये विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सिद्धापूर येथे आरबीसी ग्रुपच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून अखंडितपणे सिद्धापूर फेस्टिवलच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ उभारले आहे. या भागातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेसाठी मागणी होत असलेल्या अभ्यासिका उभारण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांनी बोलताना व्यक्त केले.
कै.रामगोंडा बापूराव चौगुले यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त रामगोंडा बापूराव चौगुले बहुउद्देशीय संस्था सिद्धापूर संचलित आर बी सी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने सिद्धापूर फेस्टिवल उत्साहात पार पडले,या फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ अवताडे बोलत होते.
वार्षिक स्नेहसंमेलन व विविध पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती रमेश भांजे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराया चौगुले, गंगाधर काकणकी, सचिन चौगुले, प्रमोदकुमार म्हमाणे, अरळीचे सरपंच आमगोंडा भांजे, धऱ्यापा सावळे, गजानन पाटील, बंडू गडदे, योगेश गरंडे, रसूल मुलाणी, सागर खबाले यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणी जणांचा सन्मान सोहळा म्हणून साहित्य क्षेत्रातून शब्दांकन पुरस्काराने पुष्पा मिसाळ, कृषीरत्न पुरस्काराने विठ्ठल बिराजदार, शिक्षकरत्न पुरस्काराने रत्नाकर माळी, स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्काराने ज्ञानागण पुरस्कार श्री संगमेश्वर प्रशाला हत्तरसंग दक्षिण सोलापूर, पत्रकारिता क्षेत्रातून जनमित्र पुरस्कार संगमेश जेऊरे सोलापूर, सामाजिक क्षेत्रातून एम के फाउंडेशन सोलापूर संस्थापक महादेव कोगनूरे, राजकीय पुरस्कार विवेक खिलारे, आदर्श पालक म्हणून सावित्री पाटील, आरोग्यरत्न पुरस्काराने डॉ. प्रीती शिर्के यांना पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन जितेंद्र लाड यांनी तर प्रस्थाविक सचिन मळगे, आभार प्रदर्शन आर बी सी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक गजानन पाटील केले.

0 Comments