सोलापूर जिल्ह्यात नविन राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी
-अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हयात नविन राहण्यासाठी येणारे व्यक्ती, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे असून, घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा इत्यादीचे विश्वस्त यांनी नव्याने राहण्यासाठी येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची त्यांच्या वास्तव्यासंबंधिची संपुर्ण माहिती न चुकता संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे केले आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्हयात जी- जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर तसेच नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची न चुकता संबंधित पोलीस ठाणेला महिती उपलब्ध करुन द्यावी.
मा. पंतप्रधान महोदय, भारत सरकार हे सोलापूर दौ-यावर दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी रे नगर मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर येथे येण्याचे नियोजित असल्याने सदर दौ-याच्या अनुषंगाने प्रशासकीय सोईच्या दृष्टीकोनातून
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे आदेश जारी केले आहेत.
एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये याकरीता प्लॉट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशीद, मंदीर व खाजगी निवसस्थाने या ठिकाणी अनोळखी अथवा संशयित इसमास त्याची ओळख पटल्याशिवाय राहण्यास परवानगी देवु नये. भाडेकरु कडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती घ्याव्यात.
एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये याकरीता स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये, तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपुर्वक करुन सुरक्षीत ठिकाणी ठेवावीत.
सदरचा आदेश हा दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी ते दिनांक 08 फेब्रुवारी 2024 (दोन्ही दिवस धरुन) सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहील असेही अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आदेशात नमूद केले आहे.

0 Comments