युवकांनी व्यसनाधिनकडे न वळता स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन मुंबई गुप्त वार्ता विभागाच्या सहाय्य्क पोलीस आयुक्त उज्वला अरुण वैद्य यांनी केले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 13, 2024

युवकांनी व्यसनाधिनकडे न वळता स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन मुंबई गुप्त वार्ता विभागाच्या सहाय्य्क पोलीस आयुक्त उज्वला अरुण वैद्य यांनी केले

 युवकांनी व्यसनाधिनकडे न वळता स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची

 प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन मुंबई गुप्त वार्ता विभागाच्या सहाय्य्क

 पोलीस आयुक्त उज्वला अरुण वैद्य यांनी केले

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा शिवराणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी भय्या कोटमाळे यांच्या वतीने शिवस्मारक सभाग्रह इथं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी मुंबई गुप्त वार्ता विभागाच्या सहाय्य्क पोलीस आयुक्त उज्वला अरुण वैद्य स्वामी विवेकानंद आणि आधुनिक भारत या विषयावर त्या बोलत होत्या याप्रसंगी कार्यक्रमास आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख,उद्योजक प्रमोद जी मोरे माजी नगरसेवक विक्रांत वानकर,शेतकरी संघटनचे अमोल हिप्परगी,वैभव हात्तुरे,नागेश खरात, सुरज बंडगर, सागर मोरे, समर्थ कदम,रोहित खताळ किरण पवार,  आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना उज्वला वैध यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची युवकांनी प्रेरणा घेऊन देश सेवेसाठीपुढे यावे असे आवाहन केले ----------------------------------------------यावेळी कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते इन सोलापूर न्युज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसंच आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात, युवा समाज सेवक अतिश सिरसाट,युवा समाज सेवक सतीश तमशेट्टी, युवक मित्र आकाश मुदगल, युवा उद्धेजक रवी अलकुंटे आणि युवा गोरक्षक पवन कोमठी या सर्वाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

दरम्यान यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्व पुरस्कारअर्थिंचे अभिनंदन करून भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस रवी कोटमाळे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले

 --------------------------------------------

भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अमोल हिप्परगी आदिनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या ---------------------------------------------

प्रारंभी प्रास्ताविक भाषनात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा शिवराणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी भय्या कोटमाळे कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला

---------------------------------------------

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages