पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील अनधिकृत अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 6, 2024

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील अनधिकृत अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन

  पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील अनधिकृत

 अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कि.मी. 8 ते कि.मी. 252.350 दरम्यान लगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे.या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे. त्यामुळे या लांबी दरम्यान केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages