Ads

Ads Area

आपल्या उत्पन्नात समाजाचाही वाटा : राजकुमार सुरवसे ऊसतोडी कामगार कुटुंबांना 300 ब्लँकेटचे वाटप समाजसेवक दत्ता सुरवसे यांच्या दातृत्व

 आपल्या उत्पन्नात समाजाचाही वाटा : राजकुमार सुरवसे 

ऊसतोडी कामगार कुटुंबांना 300 ब्लँकेटचे वाटप

समाजसेवक दत्ता सुरवसे यांच्या दातृत्व

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करत असतो. त्यातून आपल्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यातून आपण आपल्या कुटुंबाची गुजराण करतो. आपल्या उत्पन्नातील काही रक्कम शिल्लक पडते. शिल्लक रकमेतील काही अंशी वाटा हा समाजाचाही असतो. समाजाचा वाटा हा समाजाला दिला पाहिजे असे प्रतिपादन उद्योगपती राजकुमार सुरवसे यांनी केले.

                       समाजसेवक दत्ता सुरवसे यांच्या दातृत्वातून व वीरशैव व्हिजन यांच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यातील ऊसतोडी कामगार कुटुंबांना ब्लँकेट वाटप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे, केन मॅनेजर काशिनाथ पाटील, शेतकी अधिकारी सुनिल दिंडुरे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सचिव नागेश बडदाळ, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, गंगाधर झुरळे, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे उपस्थित होते.

                     याप्रसंगी कारखाना स्थळावर राहणाऱ्या कामगार कुटुंबांना 300 ब्लॅंकेटचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयकुमार बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज पाटील शीलवंत बगले व शिवराज पाटील यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close