Ads

Ads Area

विंग्ज ऑफ फायर नॅशनल लेवल एज्युकेशन अवॉर्ड 2023 सोलापूर शहरातील दोन विद्यार्थ्यांची निवड

 विंग्ज ऑफ फायर नॅशनल लेवल एज्युकेशन अवॉर्ड 2023

सोलापूर शहरातील दोन विद्यार्थ्यांची निवड

   सोलापूर (कटूसत्य वृत्त):-गुजरातच्या गमती निशाण व रुचार्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरात येथील पालनपूर येथे झालेल्या नॅशनल लेव्हल एज्युकेशन अँड सोशल इनोवेशन कॉन्फरन्समध्ये सोलापूर शहरातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. उमाबाई श्राविका विद्यालयाचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. सृजन राजकिरण चव्हाण व सु.रा.मुलींची प्रशाला सेवासदन सोलापूर शाळेची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. तेजश्री मारुती शहाणे यांची 'विंग्ज ऑफ फायर नॅशनल लेवल एज्युकेशन अवॉर्ड 2023' या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते रमाबाई आंबेडकर निवासी आश्रमशाळा, निंबर्गी येथे काल करण्यात आले. देशभरातून विद्यार्थ्यांकडून पाठवण्यात आलेल्या असंख्य नवकल्पनांपैकी सोलापूर शहरातून या दोन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्काराबद्दल या विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close