Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक २२ येथील विविध ठिकाणी ९ लाख ५० हजार रुपये खर्चून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

 प्रभाग क्रमांक २२ येथील विविध ठिकाणी ९ लाख ५० हजार रुपये खर्चून  रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक २२ चा सर्वांगीण विकास समांतरपणे झाला पाहिजे विकास कामांची अंमलबजावणी जबाबदारी पूर्णपणे घेऊन विविध स्तरातून निधी खेचून आणून प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास साधला. स्थानिक रहिवाशी मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी प्रभाग 22 साठी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यांमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि प्रभागाची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला नाही शासन स्तर तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या विविध फंडातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा विकास साधला असल्याचे सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक २२ येथील विविध ठिकाणी रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान प्रभाग क्रमांक २२ येथील संजय गांधी नगर दोन नंबर झोपडपट्टी शिवानंद किराणा दुकान पाठीमागील परिसरात ४ लाख ५० हजार रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवणे तसेच भूषण नगर येथे पाच लाख रुपये खर्ची रस्ता काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले एकूण ९ लाख ५० हजार रुपये खर्चित विविध ठिकाणी या कामाचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने व सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन २०२२-२३ भांडवली निधी अंतर्गत रस्ता कॉंक्रीकरण काम हाती घेण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नेते आदिनाथ नाना खांडेकर, मुमताज आफा शेख, काशिनाथ व्हनखळस,अमन जाकीर शेख संतोष ऋतिका गायकवाड, जमीर सय्यद, इमरान बंधाले, कयूम आतार, लतीफ शेख, मोहसीन शेख, अमोल जगताप अभिषेक सुरवसे मारुती कांबळे, कृष्णा भिसे, कृष्णा गेजगे, अमन शिंगे, दत्तात्रय डांगे, सर्फराज किल्लेदार, किरण राठोड, पवन खांडेकर, मंथन लकडे, सुरेश मामा जाधव, मुशरथ शेख, मुमताज शेख, जाहिरा शेख, खैरून मुजावर, जालीमा मुजावर, आफरीन शेख, जांबून पठाण, सुशीला रेळेकर, मनीषा जगताप, भामाताई पाटणकर, चौरंगी ताई, ज्येष्ठ माऊली, मंडाबाई चव्हाण कुमा मावशी लकडे, सुरेखा चव्हाण, काळे ताई, छाया घुले, प्रक्षाळे ताई, सुरेखा डांगे, पद्मावती भुमणे, सीमा गायकवाड, मोरे ताई, कल्पना चौरंगी, कोमल शिरसागर, छाया घुले, गंगुबाई मोरे, आशा कांबळे, आरती डांगे,माऊली जरग, उमेश जाधव, वसंत कांबळे, माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, महादेव राठोड व प्रभागातील युवक व ज्येष्ठ नागरिक महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments