उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर व एआरटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक एड्स सप्ताह दिन साजरा.
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :-उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर व A. R.T सेंटर व ICTC विभाग, विहान प्रकल्प परम प्रसाद चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सप्ताह दिन "आता नेतृत्व व आघाडी समुदायाची." वाटचाल एड्स संपवण्याच्या दिशेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. अविनाश उईकी, डॉ. विनिता धसे डॉ. आशा घोडके, डॉ. दीपक धोत्रे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जागतिक एड्स सप्ताह दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना सकस आहार 70 किटचे वाटप केले, किसन ऑर्गानिक ज्यूस चे सर्व लाभार्थीला वाटप करण्यात आले. यावेळी डी. एम. स्वाती माने,समुपदेशक मीनाक्षी कदम, दीपक गोरे, युवराज वांगी, संदीप देशमुख , ICTC पुरुषोत्तम कदम एजाज बागवान, नामदे, सि . क्लार्क योगेश संगपवाड, आहार तज्ञ अनुराधा वाघमारे, युवराज विजापूरे परम प्रसाद संस्था विहान प्रकल्प संतोष शेंडगे, सुनील चांदणे, राजश्री टकले, यांची उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी केअर कॉडनेटर बाळासाहेब पांढरे, धनंजय कुंभार तुकाराम साठे, भारत सोनवले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम कदम यांनी केले तर आभार दीपक गोरे यांनी मानले.

0 Comments