वाचनाने स्पर्धा जिंकता येतात -ग्रंथमित्र जयंत आराध्ये
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-हुतात्मा आणि ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय,सोलापूर व केंगनाळकर प्रशाला, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणादिन व ग्रंथालय सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन केंगनाळकर प्रशालेमध्ये केले गेले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याना पारितोषिक वितरणाचा समारंभ केंगनाळकर प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र जयंत आराध्ये होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, हुतात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ वृषाली हजारे ,ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या सौ.सारीका मोरे, सौ सारिका माडिकर या उपस्थित होत्या. सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर बुद्धिमत्ता, चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर आणि वक्रुत्व या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रशस्तीपत्र, रोख रक्कम आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता दोडमणी या विद्यार्थिनीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केले .विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाची आणि विविध स्पर्धेची आवड असावी असे मनोगत अध्यक्षीय भाषणात ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार केंगनाळकर प्रशालेचे प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता अशा विद्यार्थ्यांचेही अभिनंदन यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमास ग्रंथमित्र जयंत आराध्ये, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ,प्राचार्य विद्यानंद स्वामी, मुख्याध्यापक नितीन कुलकर्णी, बाबुराव रेउरे ,कविता स्वामी, आकांक्षा मॅडम, सारिका मोरे ,सारिका माडीकर, वृषाली हजारे, केंगनाळकर प्रशालेचा शिक्षक स्टाफ, इतर स्टाफ पालक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


0 Comments